Sat, Jun 06, 2020 16:15होमपेज › Marathwada › मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील यांना पितृशोक

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील यांना पितृशोक

Published On: Jan 28 2019 3:48PM | Last Updated: Jan 28 2019 3:37PM
लातूर : प्रतिनिधी 

शहरातील ज्येष्ट नामांकित विधिज्ञ तथा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांचे वडील हरिश्चंद्र पाटील (वय ९६) यांचे सोमावारी(ता. २८ जानेवारी )पहाटे निधन झाले. येथील मारवाडी स्मशानभूमीत सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हरिश्चंद्र पाटील यांचे शिक्षण हैदराबाद येथे झाले होते. मराठवाड्यातील प्रसिद्ध वकील म्हणून त्यांचा परिचय होता. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात न्यायमूर्ती नरेश पाटील, दिनेश पाटील, विरेश पाटील ही तीन मुले आहेत.