Wed, Feb 26, 2020 18:27होमपेज › Marathwada › पत्रकार अजय ढवळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारीता पुरस्कार जाहीर

पत्रकार अजय ढवळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारीता पुरस्कार जाहीर

Last Updated: Jan 23 2020 8:24PM

अजय ढवळेवाशीम : प्रतिनिधी

घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याव्दारा प्रकाशित पहीले वृत्तपत्र ‘मूकनायक’ या वृत्तपत्राच्या शताब्दी वर्षानिमित्त येथील येथील दैनिक पुढारी या अग्रगण्य वृत्तपत्राचे वाशीम जिल्हा प्रतिनिधी अजय ढवळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ३१ जानेवारीला नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमिवर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

वाचा : 'साई जन्मभूमीला न्याय मिळण्यासाठी कृती समिती न्यायालयात जाणार' 

‘मूकनायक’ या वृत्तपत्राला १०० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल युगंधर क्रीएशन, वंदना संघ दीक्षाभूमी आणि लॉर्ड बुध्दा मैत्री संघाच्या वतीने शताब्दी वर्ष साजरा केला जात आहे. या शताब्दी वर्षानिमित्त शुक्रवार, ३१ जानेवारीला दीक्षाभूमि नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारीता पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी सामाजीक न्यायमंत्री राजकुमार बडोले, विशेष उपस्थितीमध्ये मध्यप्रदेश सरकारमधील वरिष्ठ आयएएस अधिकारी रमेश थेटे, नागपूरचे पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार बबनराव वाळके, लॉर्ड बुध्दा टीव्हीचे भैयाजी खैरकर, निर्मल समुहाचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे, विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे, कौटील्य अकादमी भोपाळचे राहुल रंगारे, टायगर फोर्ट रिसोर्टचे सुधाकरराव इंगोले, ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद, ओबीसी संघाचे डॉ. बबनराव तायवाडे, दीक्षाभूमि स्मारकाचे विलास गजघाटे, प्रहार सेवक प्रदीप उबाळे, जनसुराज्य संघटनेचे राजेश काकडे, आधार मल्टीस्टेटचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील सौदरमल, तरुणभारतचे संपादक गजानन निमदेव, पुण्याचे उद्योजक सी.आर. सांगलीकर, वंदना संघाचे प्रा. देविदास घोडेस्वार, पिंपरी चिंचवडचे उद्योजक अमित मेश्राम, छत्तीसगडचे सर्जन डॉ. उदय धाबर्डे, कार्यक्रमाचे निमंत्रक सचिन मुन व आदींच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

वाचा : नांदेड : तिहेरी अपघातात एक ठार, एक गंभीर

पत्रकार अजय ढवळे हे गेल्या दोन दशकापासून वाशीम जिल्हयातील पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक नामवंत दैनिकांसह विविध वृत्तवाहीन्यांमध्ये त्यांनी विविधांगी लेखन करुन समाजाच्या तळागाळातील व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकारीतेत उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना याआधी अनेक सेवाभावी संस्था व संघटनांकडून पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या पत्रकारीतेच्या कार्याची दखल घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारीता हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हयातील वृत्तपत्र क्षेत्रासह विविध क्षेत्रातून व चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वाचा : शासन साजरी करणार शंकररावांची जन्मशताब्दी