Mon, Jun 01, 2020 18:29
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › जिंतूर तहसील अस्वच्छतेचे माहेरघर

जिंतूर तहसील अस्वच्छतेचे माहेरघर

Published On: Apr 25 2019 5:16PM | Last Updated: Apr 25 2019 5:16PM
जिंतूर : प्रतिनिधी 

देश व राज्य पातळीवर स्वच्छतेचा नारा गाजत असतांना स्वच्छतेवर केंद्र व राज्यशासन लाखो रुपये खर्च करत आहे. सर्वत्र या बाबत जनजागृती होतांना दिसून पण येत आहे ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्वत्र स्वच्छतेच्या दुही चौफेर दुमदुमत असताना शहरातील तहसील कार्यालया वरील दुसरा मजला कमालीचा दुर्लक्षित होऊन अस्वच्छता  आहे. ज्यात वरच्या मजल्यावर ठिकठिकाणी वापरात नसणारे साहित्य या सोबतच विशेषतः कागदी रेकॉर्ड असलेले बांधून फेकलेले गठ्ठे,  दुसऱ्या मजल्याच्या काही कोपऱ्यात अडवळणीला अस्ताव्यस्त अवस्थेत रेकॉर्डचे गठ्ठे नजरेस पडत आहेत.

त्याच बरोबर तहसील कार्यालय हे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाचे कार्यालय असल्यामुळे येथे शासकीय कामा साठी येणाऱ्याची संख्या मोठी असते. याच दुसऱ्या मजल्यावर दुय्यम निबंधक यांचेही महत्वाचे कार्यालय असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या जास्त आहे, पण दुर्दैवाची बाब अशी की, याच वरच्या मजल्याच्या प्रत्येक कोपऱ्यात खुटका व पान खाल्लेल्या बहाद्दरानी पिचकाऱ्यानी सर्व शासकीय भिंती रंगवून टाकल्या आहेत. या सर्व बाबीकडे स्थानिक तालुका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे हे सिद्ध होते.

काही वर्षा पूर्वी येथील मजबूत निजामकालीन तहसीलची इमारत जमीनदोस्त करून ही दुमजली इमारत बांधली असून सध्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कमालीची अस्वच्छता व ठिकठिकाणी महत्वाच्या रेकॉर्डचे गठ्ठे अस्ताव्यस्त व भित्तीवर जागोजागी थुकींच्या पिचकाऱ्याचे अस्वच्छ डाग दिसत असल्याने सर्व सामान्य नागरिकांत असंतोष भडकत आहे.   
अशा सर्व अस्वच्छतेकडे स्थानिक तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शहरातील सुजान नागरिक करीत आहेत.