Fri, Jun 21, 2019 01:31होमपेज › Marathwada › जिंतूरमध्ये परशुराम जयंती उत्साहात साजरी

जिंतूरमध्ये परशुराम जयंती उत्साहात साजरी

Published On: May 09 2019 4:09PM | Last Updated: May 09 2019 3:54PM
जिंतूर : प्रतिनीधी 

ब्राम्हण समाज बाधवांच्या वतीने मोठया उत्साहाने परशुराम जयंती आज (दि. ९) रोजी साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अनेक भक्तजण सहभागी झाले.  

जिंतूर येथील परशुराम यांच्या प्रतिमेस फुलांनी सजवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर या प्रतिमेची सदर मिरवणूक विठ्ठल मंदिर ते शिवाजी चौक, मोंढा रोड मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिरापर्यत काढण्यात आली. 

या कार्यक्रमात बहुभाषीक ब्राम्हण महासंघ, ब्राम्हण युवा संघ, सद्गुरू ब्राम्हण महिला मंडळ आदींच्या सहयोग दर्शविला. यासाठी सौ. शैलजा देशपांडे शैलजा बंगाळे, कांतराव धानोरकर, रणधीर शोभणे, नितीन बंगाळे,  प्रशांत देशपांडे, प्रदीप चक्रपाणी, शंतनु कुलकर्णी, माहेश्वरी मारवाडी समाजातील अॅड पंकज तिवारी, महेश शर्मा आणि उमेश शर्मा पोरवाल आदींनी अथक परिश्रम घेतले आहेत.