Sun, May 31, 2020 03:27होमपेज › Marathwada › जालन्यात अज्ञात चोरट्यांकडून जनावरांची चोरी

जालन्यात अज्ञात चोरट्यांकडून जनावरांची चोरी

Published On: Feb 14 2019 1:12PM | Last Updated: Feb 14 2019 1:00PM
जालना : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथे शेतकऱ्यांच्या गोठ्यातून दोन बोकड, दोन शेळ्या आणि वीस कोंबड्यांची चोरी झाली आहे. गुरूवारी (दि, १४ फेब्रुवारी)  पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही चोरी करण्यात आली. जरनावरांची चोरी झाल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, रामगव्हाण येथे अरुण दिंगबर चेपटे हे शेतकरी राहतात. गुरुवारी पहाटे साडेचार वाजता झोपेतून  उठल्‍यानंतर नेहमीप्रमाणे आपल्‍या गोठ्यात गेले. यावेळी त्‍यांच्या गोठ्यातून २ बोकड, २ शेळ्या आणि २० कोंबड्या गायब असल्याचे लक्षात आहे. 

दरम्‍यान, वडिगोद्री परिसरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहे. आता चोरट्यांना मौल्यवान वस्तु हाती लागत नसल्याने जनावरे चोरण्याचा सपाटा  लावला आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळाने हतबल झाला असून त्यातच जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अजून मोठी भर पडली आहे. असे असताना गेल्‍या १५ दिवसांत चोरीच्या घटनांचा तपास गोदी पोलिसांनी केला नाही. त्‍यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्‍त केजी जात आहे.