Sat, Jun 06, 2020 16:25होमपेज › Marathwada › बंदुकीचा रुबाब अडकला सॉफ्टवेअरच्या तडाख्यात

बंदुकीचा रुबाब अडकला सॉफ्टवेअरच्या तडाख्यात

Published On: May 11 2018 1:39AM | Last Updated: May 11 2018 12:46AMबीड : शिरीष शिंदे

शस्त्राचा गैरवापर होऊ नये यासह विविध उद्दिष्ट समोर ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक शस्त्र परवानाधारकास युनिक आयडेंटीफि केशन नंबर (युआयडी) देण्याचे काम ऑनलाइन पद्धतीने 31 मार्च पर्यंत करण्यात आले, मात्र त्यानंतर नॅशनल डाटाबेस ऑफ  आर्मच्या संकेतस्थळावरील सॉफटवेअरमधील युआयडीसाठीची नोंदणी बंद करण्यात आली. त्यामुळे असंख्य परवानाधारक या क्रमांकापासून वंचित राहिले आहेत. ज्यांच्याकडे हा युनिक क्रमांक नाही त्यांचे शस्त्र अवैध ठरणार आहे, दरम्यान जिल्ह्यातील 1068 शस्त्र परवानाधारकांना हा युनिक आयडी देण्यात आला आहे. 

मागील दोन वर्षांपासून शस्त्र परवाना धारकांची माहिती नॅशनल डाटाबेस ऑफ  आर्म लायसन्स (एनडीएल)च्या संकेतस्थळावरील सॉफटवेअरमध्ये ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्यात आली. त्यानंतरच्या कालावधीत प्रत्येक शस्त्र परवानाधारकास युनिक आयडेंटीफ ीकेशन नंबर देण्याचा निर्णय झाला. परवानाधारकाचा परवाना नूतनीकरण झाल्यानंतर त्यांना युआयडी देण्यात येत होते. त्यासाठीची आवश्यक ती कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात दिल्यानंतर सदरील क्रमांक दिला जात होता. शस्त्र परवानाधारकांनी युआयडी क्रमांक घ्यावा यासाठीची आवश्यक ती जनजागृती केली होती. यासाठीच्या नोंदणीची शेवटीची तारीख 31 मार्च होती, मात्र अनेक परवानाधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना युआयडी क्रमांक मिळू शकला नाही. एनडीएलच्या संकेतस्थळावर युआयडीसाठीची नोंदणी केव्हा सुरू होईल याची प्रतीक्षा शस्त्र परवानाधारक करत आहेत. 

गोळ्यांची खरेदी

बंदूक किंवा रायफ ल परवाना धारक हे शासनाने नेमून दिलेल्या एजन्सीमधून गोळ्यांची खरेदी करतात. त्याची नोंद तीन ते चार ठिकाणी केली जाते. शस्त्र परवानाधारकांना युआयडी क्रमांक देण्यात आला आहे. सदरील क्रमांका शिवाय आता बंदुकधारकांना बंदुकीसाठीच्या गोळ्या मिळणार नाहीत. युआयडी असेल तर पुढील प्रक्रिया होणार आहे. एनडीएल मार्फ त शासन मान्य आर्म विक्री करणार्‍या एजन्सींना देशभरातील युआयडी क्रमांक दिले आहेत. 

रिव्हॉल्व्हरची तरुणांमध्ये के्रझ

बंदूक म्हणजे प्रतिष्ठा असे कधीकाळी समीकरण होते ते आजही कायम आहे. बंदुकीला ग्लॅमर आल्याने प्रशासनाकडे अर्जांचा पाऊस पडत आहे. संरक्षणासाठी शस्त्रपरवाना हवा या कारणास्तव अर्ज केले जातात. एका मोठ्या वर्गाला बंदूक असणे अजूनही प्रतिष्ठेचे लक्षण वाटते. यासाठी ही मंडळी पिस्टल किंवा रिव्हॉल्व्हरसाठी अर्ज करत राहतात. सुशिक्षीत बेरोजेगार मंडळी शस्त्र परवान्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज करत असल्याचे मागच्या वर्षभरात समोर आलेले आहे. बहुतांश अर्ज नाकारले जात असतानाही अर्जदारांची संख्या मात्र सतत वाढणारी आहे.

1988 पासूनच्या परवान्याची नोंदणी

जिल्हा प्रशासनाच्यावतीने 1988 पासून शस्त्र परवान्याची नोंदणी कागदी स्वरुपात आहेत. काही परवानाधारक आपले लायसन्सचे नूतणीकरतात मात्र काहींचे लायसन्सहे गुन्हा दाखल झाल्यामुळे रिन्यू होत नाहीत.