Thu, Jun 04, 2020 22:55होमपेज › Marathwada › गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात हिंगोलीतील जवान शहीद

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात हिंगोलीतील जवान शहीद

Published On: May 01 2019 7:59PM | Last Updated: May 01 2019 7:59PM
हिंगोली : प्रतिनिधी 

राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी - ६० पथकाचे १६ जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील संतोष देविदास चव्हाण या 37 वर्षीय जवानाला वीरमरण आले आहे.

औंढा तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील संतोष देविदास चव्हाण यांची गडचिरोली येथील क्यू आर टी पथकात नेमणूक होती. नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी हे पथक विशेष कामगिरी पार पाडत असते. आज 1 मे रोजी गडचिरोलीतील जांबूरखेडा गावापासून सी-60 पथक खाजगी वाहनाने जात असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 16 जवान शहीद झाले आहेत. 

त्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील दोन हजार लोकवस्ती असलेल्या ब्राह्मणवाडा तांडा येथील संतोष देविदास चव्हाण या जवानांना वीरमरण आले आहे. 2017 साली अश्विनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांचे वडील सेवानिवृत्त एस आर पी कर्मचारी असून त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील बहिण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी गावात कळताच गावात शोककळा पसरली आहे.