Sun, May 31, 2020 01:53होमपेज › Marathwada › मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर

मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 10:54PMवडवणी : प्रतिनिधी

आर्थिक परस्थिती आणि मराठा आरक्षणाअभावी  साळिंबा येथील वैद्यकीय पदवी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मयत आईच्या शीतल नावाच्या मुलीचा वैद्यकीय पदवी प्रवेश करण्यासाठी हालचाली थेट मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून चालू झाल्या आहेत. मोहनराव जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.

वडवणी तालुक्यातील साळिंबा येथील सरस्वती अशोक जाधव या मातेने आपल्या मुलीचा वैद्यकीय पदवी प्रवेश न झाल्यामुळे आत्महत्या केली होती. घरची आर्थिक परस्थिती बेताची असल्याने मजुरी करून त्यांनी मुलीला लातूर येथे वैद्यकीय पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी लातुरला ठेवले होते. मुलीने चांगले घेतल्याने तिचा वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी नंबरही लागला होता, मात्र प्रवेशासाठी आवश्यक असणारी फिसचे पैसे नसल्याने मुलीचा प्रवेश घेणे मुदतीत शक्य झाले नाही.  

मराठा आरक्षण मिळाले असते तर मुलीचे शैक्षणिक नुकसान झाले नसते अशी भावना व्यक्त करून मुलीच्या आईने आत्महत्या केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद बीड जिल्ह्यात उमटले असून जाधव कुंटुंबाच्या नुकसानीला मराठा आरक्षण असल्याचे मराठा समाजाने म्हटले आहे. जाधव कुंटुंबाला दहा लाखांची आर्थिक मदत व एक मुलाला सरकारी नोकरी देण्याची मागणी सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्याकडे सोमवारी केली होती. मंगळवारी सकाळी प्रकाश सोळंके तर सायंकाळी छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी साळिंब्यातील जाधव कुटुंबाला भेट दिली. जगताप यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना दूरध्वनीवरून चर्चा केली. 

आर्थिक मदतीसह नोकरीसाठी पालकमंत्र्यांना भेटणार

साळिंबा येथील मयत सरस्वती जाधव यांनी मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली असल्याने आपण पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे भेटून दहा लाखांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका जणाला सरकारी नोकरी देण्याची मागणी गुरुवारी करणार असल्याचे मोहनराव जगताप यांनी यावेळी सांगितले.