Sat, Jun 06, 2020 16:39होमपेज › Marathwada › हिंगोली : कृउबा समितीचे हरिचंद्र शिंदे लाच घेताना ताब्‍यात 

हिंगोली : कृउबा समितीचे हरिचंद्र शिंदे लाच घेताना ताब्‍यात 

Published On: Jan 19 2018 8:40PM | Last Updated: Jan 19 2018 8:40PMहिंगोली : प्रतिनिधी

कृषी उत्‍पन्न बाजार समितीचे सभापती हरिचंद्र शिंदे यांना पन्नास हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. बाजार समिती अंतर्गत लिलावातून कॅन्टीनच्या (हॉटेल) व्यवसायाकरिता दोन गाळे तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावावर घेतले होते. परंतु, त्याचे बांधकाम सुरू व्हायचे असल्याने हॉटेल चालविण्यासाठी कृउबा समितीमध्ये पर्यायी जागा देण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदारास सव्वा लाखाची लाचेची मागणी केली होती. त्‍यापैकी पन्ना हजार रूपयांची लाच घेताना त्‍यांना रंगेहाथ पकडले. हिंगोलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता  ही कारवायी केली.

याबाबत तक्रारदाराने शिंदे याच्या विरोधात लालेची मागणी केल्‍याची तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता,  मागणी केलेल्‍या लाचेतील रकमेचा पन्नास हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना शिंदे यांनी त्यांच्या गाडीचे चालक संतोष रंजवे यांच्या मार्फत बाजार समितीतील शेतकरी निवास येथील कार्यालयाच्या प्रांगणात रंगेहाथ पकडण्यात आले. शिंदेसह चालक रंजवे यास ताब्यात घेतले आहे.