Sat, Jul 04, 2020 16:52होमपेज › Marathwada › परभणीत सहा कोरोनाबाधितांची भर, एकाचा मृत्यू

परभणीत सहा कोरोनाबाधितांची भर, एकाचा मृत्यू

Last Updated: May 30 2020 8:15AM

संग्रहित छायाचित्रपरभणी : पुढारी वृत्तसेवा 

शुक्रवारी (दि.२९) दुपारी वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथील व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर जिंतूरमध्ये चिंता वाढली. दरम्यान अवघ्या काही तासात नांदेड येथील प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाले. त्यात आणखी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. 

वाघी बोबडे (ता. जिंतूर) येथील ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. याच्या आधीही जिल्ह्यात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज आणखी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू होण्याची दुसरी घटना असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू आणि ६ कोरोना बाधितांची एकाच दिवशी भर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

वाशिम : 'त्या' कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू 

आज प्राप्त झालेल्या अहवालांत पुर्णा, सेलू गंगाखेड, मानवत या तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. तर आज मिळालेले ६ रूग्ण असे  जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ एवढी झाली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नांदेड येथील प्रयोग शाळेत एकूण ३०९ व्यक्तींचे अहवाल प्रलंबीत होते. सकाळी एकूण ३८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला. नांदेड येथील प्रयोगशाळेवर नांदेड, हिंगोली व परभणीचाही ताण आल्याने तेथून स्वॅबचे अहवाल मिळण्यास मोठा विलंब होतो आहे.