Thu, Oct 17, 2019 05:29होमपेज › Marathwada › गोपीनाथ मुंडेंचा स्मृतीदिन; परळीत गोपीनाथ गडावर जनसागर!

गोपीनाथ मुंडेंचा स्मृतीदिन; परळीत गोपीनाथ गडावर जनसागर!

Published On: Jun 03 2019 2:35PM | Last Updated: Jun 03 2019 2:35PM
 परळी वैजनाथ :  प्रतिनिधी 

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिननिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी परळीत गोपीनाथ गडावर जनसागर दाखल झाला आहे. 

गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने वतीने यंदा विविध सामाजिक उपक्रमांबरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवनिर्वाचित खासदारांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम होत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही वेळातच मुख्य समारंभ सुरू होणार आहे. 

सकाळपासूनच  जनतेनी शिस्तबद्ध रांगेतून लोकनेत्याच्या समाधीचे दर्शन घेत आहेत. गोपीनाथ गड परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठवाड्यातील आमदार, खासदार भाजपा, शिवसेना, रिपाइंचे तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.