होमपेज › Marathwada › जिंतूर : एकता लोकसंचलित साधन केंद्रातर्फे मतदान जनजागृती रॅली

जिंतूर : एकता लोकसंचलित साधन केंद्रातर्फे मतदान जनजागृती रॅली

Published On: Apr 16 2019 4:47PM | Last Updated: Apr 16 2019 4:47PM

जिंतूर : प्रतिनिधी 

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या एकता लोकसंचलित साधन केंद्र, जिंतूर येथे आज (दि. १६) मतदान जनजागृती रॅली काढण्‍यात आली. जिंतूरच्‍या पंचायत समितीपासून ते मार्केट मार्गे नगर परिषद, जिंतूर आणि एकता लोकसंचलित साधन केंद्र, हुतात्मा स्मारक जिंतूर कार्यालयापर्यंत सदर मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये दीनदयाळ राष्ट्रीय उपजीविका अभियान आणि तेजस्विनी महिला सक्षमीकरण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मतदान जागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये मारोती घुगे, मंदा वाकळे,  अशोक घुगे, राणी बुरकुले, माया कांबळे, सुशिला राठोड,  दिपाली चव्हाण, संतोषी गीते, सविता अंभोरे, लक्ष्मीबाई वाकळे आदी महिला उपस्थित होत्‍या.