Sun, May 31, 2020 03:34होमपेज › Marathwada › मुलींचा जन्मदर 958 वर; परभणी मराठवाड्यात अव्वल

मुलींचा जन्मदर 958 वर; परभणी मराठवाड्यात अव्वल

Published On: Nov 26 2018 1:23AM | Last Updated: Nov 25 2018 10:12PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्याचा स्त्री-पुरुष जन्मदर हा 1000 मुलांमागे कमी होता. भाजप सत्तेवर आला तेव्हापासून देशात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी राबवले. गावागावांत जाऊन जनजागृती केली. यामुळे जिल्ह्यात हेे प्रमाण वाढून 958 वर पोहचले, अशी माहिती जिल्हा समन्वयक राजश्री जामगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी बाबासाहेब जामगे, शेषराव सुपेकर उपस्थित होते. पुढे त्या म्हणाल्या, मुलींच्या जन्मा संदर्भात समाज अनिष्ठ रुढी, प्रथा, परंपरा जपत असल्याची जाणिव झाली.आधुनिक काळात स्त्री विरोधी विकृत प्रवृत्तींमुळे मुलींना जन्मास येण्यापूर्वी नष्ट करणार्‍या मानसिकता समाजात आजही जिवंत आहे. अभियानाचा हेतू पूर्ण करण्यासाठी गर्भधारणा केलेल्या महिलांची माहिती घेवून समुपदेशन केले. विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली. आशा स्वंयसेवीका, अंगणवाडीताई, स्वंयसेवीकांची मदत घेवून  जनजागृती घडवून आणली. आज जिल्ह्यात जन्मदराचे प्रमाण वाढले. मानवत तालुक्यातहे प्रमाण खुप कमी आहे यामुळे मुलींच्या जन्मदरात जिल्हा पुढे जात नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.