Fri, Jun 05, 2020 20:42होमपेज › Marathwada › जिंतूरमध्ये गरोदर महिलेचा ब्लड ग्रुप बदलला, जिल्हा शल्य चिकित्सककडे तक्रार

जिंतूरमध्ये गरोदर महिलेचा ब्लड ग्रुप बदलला

Published On: May 22 2019 6:46PM | Last Updated: May 22 2019 7:16PM
जिंतूर  : प्रतिनिधी 

शहरातील तहसीलदार कार्यालयासमोरील मोरेश्वर लॅब आणि डॉ. वाघमारे दवाखाना, जिंतूर यांच्याबाबत नगरसेवक सोहेल यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, परभणी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. सदर निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, परभणी यांना पाठविले असून डॉ. वाघमारे हॉस्पिटल  येथे मोरे नावाची व्यक्ती तज्ज्ञ डॉक्टर नसताना मोरेश्वर लॅब चालवत असून सर्रासपणे स्त्रिया, लहान बाळ व गरोदर मांताची तपासणी करून रूग्णाच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

नगरसेवक सोहेल यांच्या नातेवाईकांची मुलगी मोरेश्वर लॅब येथे गरोदरपणाचे ब्लड प्रोफाईल तपासणीसाठी (दि. १८ रोजी) गेली होती. यानंतर संबंधित मोरे नावाच्या व्यक्तीने चक्क ब्लड ग्रुप A चा B असा लिहून खोटा रिपोर्ट दिला. यानंतर त्यांना स्वतःचा ब्लड ग्रुप माहित असल्याने हा प्रकार उघडकीस आला.  

त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, परभणी यांच्याकडे तक्रार दिली आहे. तसेच शहरात अनधिकृत लॅबधारकांचा धंदा खासगी डॉक्टरांच्या संगमताने जोरात सुरु आहे. जनतेची आर्थिक पिळवणूक करून रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार शहरात सुरु आहे, असा आरोप या निवेदनात केला आहे. 

तर मोरेश्वर लॅब, वाघमारे हॉस्पिटलमध्ये व शहरातील इतर सर्व लॅबची तत्काळ तपासणी करून कडक कारवाई करावी अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी यावेळी केली आहे.