Sun, May 31, 2020 02:42होमपेज › Marathwada › ठाण्यातच हाणामारी करणारे चार पोलिस निलंबीत

ठाण्यातच हाणामारी करणारे चार पोलिस निलंबीत

Published On: Mar 03 2019 7:45PM | Last Updated: Mar 03 2019 7:44PM
उस्मानाबाद/उमरगा : प्रतिनिधी

ठाण्यातच एका सहकार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचार्‍यांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसी शिस्तीचे धिंडवडे काढल्याने पोलिस अधीक्षक आर. राज यांनी आरोपी, फिर्यादी अशा चारही पोलिस कर्मचार्‍यांना निलंबीत केले आहे.

उमरगा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक राजुदास सिताराम राठोड हे शनिवारी दि. २ रोजी  रात्री उशीरा ठाण्यातच आपल्या उत्तर बिट मधील खोलीत काम करत बसले होते.  त्यावेळी रहा ठाण्यातील पोलिस कर्मचारी लाखन सुभाष गायकवाड, मयुर राजाराम बेले, सिध्देश्वर प्रकाश शिंदे व त्यांचा खासगी वाहनचालक गणेश कांबळे हे आले व धारदार शस्त्राने तसेच काठीने मारहाण करत, तुला जिवंत सोडणार नाही म्हणत जबर मारहाण केली.

या मारहाणीत पोलिस नाईक राठोड हे गंभीर झाले असून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून उमरगा पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची गंभीर दाखल घेत पोलिस अधीक्षक राजा यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली. त्यांचा अहवाल आल्यानंतर पोलिस खात्याची शिस्त माहिती असूनही त्यांनी बेशिस्त वर्तन केले, खात्याची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत आरोपी तसेच फिर्यादी अशा चारही पोलिस कर्मचार्‍यांना निलंबीत केले.