Sun, Oct 20, 2019 16:50होमपेज › Marathwada › रस्त्यांसाठी पावणेचार कोटींचा निधी

रस्त्यांसाठी पावणेचार कोटींचा निधी

Published On: Dec 10 2018 1:12AM | Last Updated: Dec 09 2018 9:56PM
माजलगाव : प्रतिनिधी

माजलगाव मतदारसंघाचा विकासाचा आराखडा आ.आर.टी.देशमुख यांनी चार वर्षांपूर्वी आखला.  मागील 4 वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी मतदारसंघात आणला. सध्या 14 तांड्यावरील अंतर्गत रस्त्यांसाठी 70 लाख व 80 गावांतील गाव अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना आ.देशमुख यांनी विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

माजलगाव मतदारसंघातील विविध गावाकरिता स्वातंत्र्यानंतर जेवढा निधी कधी आला नाही त्या पेक्षा जास्त निधी आ.देशमुखांच्या प्रयत्नातून मतदारसंघाकरिता मागील 4 वर्षात  आला आहे. विकासकामांना निधी नसल्याने मतदारसंघाचा प्रत्येक क्षेत्रातला अनुशेष प्रचंड वाढला होता. अगदी पायाभूत सुविधा सुद्धा मतदारसंघात मिळत नव्हत्या. आर.टी.देशमुख  आमदार झाले तेंव्हा पासून त्यांनी मतदारसंघाच्या विकासाचा कालबद्ध आराखडा तयार केला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पंकजा यांच्या सहकार्याने कोट्यवधी रुपये निधी विविध रस्त्यावर मंजूर करवून घेऊन मतदारसंघात रस्त्यांचे जाळे उभारले. वर्तमान स्थितीमध्ये मतैदारसंघातील 80 गावातील गावंतर्गत रस्त्यासाठी 3 कोटी रुपये तर 14 तांड्यावरील तांडा अंतर्गत रस्त्यांसाठी 70 लक्ष रुपयांचा निधी पाहिल्या टप्यात मंजूर करवून घेतला आहे. लवकरच सदरील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यातील कामे प्रशासकीय मंजुरीच्या स्तरावर आहेत. 

विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा

माजलगाव मतदारसंघात आ.देशमुख, माजी आ.प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप असे नेते विधानसभेच्या स्पर्धेत आहेत. सध्या प्रकाश सोळंके दुष्काळ दौर्‍यावर आहेत तर मोहन जगताप मित्रमंडळाच्या शाखा स्थापन करत आहेत. या दरम्यान दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. आ.देशमुख यांनी या आरोपांच्या फै रीत अडकण्याऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आ.देशमुख यांनी अधिकार्‍यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या असून माजलगाव, वडवणी व धारूर तालुक्यातून आलेेल टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न सुरु आहेत.