Sat, Oct 19, 2019 10:52होमपेज › Marathwada › आमदार विजय भांबळेंकडून 'त्‍या' कुटुंबाना आर्थिक मदत

आमदार भांबळेंकडून 'त्‍या' कुटुंबाना आर्थिक मदत

Published On: Apr 29 2019 4:37PM | Last Updated: Apr 29 2019 4:11PM
जिंतूर : प्रतिनिधी

मौजे कुऱ्हाडी येथे उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्‍यू झाला. ही घटना २४ एप्रिल रोजी कुऱ्हाडी येथे घडली. पवन दिलीप आढे (वय १४, रा.मंठा) व करण सुभाष निकाळजे (वय ८ वर्षे, रा.कुऱ्हाडी)  हे दोघे गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्यातील गाळात पाय आडकून त्‍यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन आमदार विजय भांबळे यांनी सांत्वन केले. 

यावेळी आमदार विजय भांबळे यांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात म्हणून दोन्ही कुटुंबियांना प्रत्येकी २१,००० रुपयांची मदत दिली.यावेळी विश्वनाथ राठोड, गणपत राठोड, रमेश चव्हान( सरपंच कुऱ्हाडी), रामराव बंदुसिंग चव्हाण,संदीप राठोड, राजेश पवार, कोंडीराम राठोड, उत्तम राठोड, माउली सरकटे, बापूराव घुगे, डॉ. सानप, भाऊ राठोड, सुभाष काजळे, बंडू चव्हाण आदी उपस्थित होते.