Sun, Jun 07, 2020 15:48होमपेज › Marathwada › शिवरायाबद्दल बदनामीकारक लिखाण, लेखक, प्रकाशकाविरुद्ध गुन्हा

शिवरायाबद्दल बदनामीकारक लिखाण, लेखक, प्रकाशकाविरुद्ध गुन्हा

Published On: Dec 15 2018 10:40PM | Last Updated: Dec 15 2018 10:40PM
लातूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊबद्दल बदनामीकारक लिखाण करणारे संस्कृत सारिका प्रतिदर्श कृतिपत्रिका या पुस्तकाचे लेखक राजेंद्र शास्त्री (गायकवाड) व निकिता प्रकाशनाच्या प्रकाशकांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. लातूर संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाअध्यक्ष ववैजनाथ जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

निकिता प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा वंशवृक्ष चुकीचा दाखवण्यात आला होता. त्यात  जिजाऊंना शिवरायांच्या पत्नी  असे दाखवले गेले होते. या पुस्तकातील चुकीचा मजकूर असलेले पान व्हाट्सअॅप वरून व्हायरल झाल्यानंतर ही चूक उघड झाली होती.