Sun, Jun 07, 2020 08:26होमपेज › Marathwada › पैशासाठी पित्याचा खून करून दाखवली शेतकरी आत्महत्या

पैशासाठी पित्याचा खून करून दाखवली शेतकरी आत्महत्या

Published On: Sep 18 2018 1:37AM | Last Updated: Sep 18 2018 12:48AMकिल्‍लारी : प्रतिनिधी

शेतकरी आत्महत्या झाल्यास राज्य सरकार मदत करते, या मदतीच्या लालसेपोटी मुलानेच जन्मदात्या पित्याच्या डोक्यात दगड घालून खून केला व नंतर मृतदेह विहिरीत फेकल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना औसा तालुक्यात उघडकीस आली आहे. शेतकरी आत्महत्या हा विषय सध्या गांभीर्याने पाहिला जात असल्याने आपण केलेला खून पचनी पडेल व शासकीय मदतही मिळेल, या विचाराने आपणच वडिलांचा खून केल्याची कबुलीच आरोपीने दिली आहे. संक्राळ (ता. औसा) येथील बालाजी नामदेव माळी (वय 39) याने दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घरी झोपलेले वडील नामदेव सहदेव माळी (64) यांना डोक्यात दगड घालून ठार मारले. रात्री पत्नीच्या मदतीने मृतदेह गावाशेजारील विहिरीत टाकला.