Sun, Jun 07, 2020 14:56



होमपेज › Marathwada › अंबाजोगाई : दुष्काळ निवारणासाठी तीन दिवसांपासून शेतकर्‍याचा अन्नत्याग

अंबाजोगाई : दुष्काळ निवारणासाठी तीन दिवसांपासून शेतकर्‍याचा अन्नत्याग

Published On: Aug 25 2019 7:12PM | Last Updated: Aug 25 2019 7:12PM

अंबाजोगाई : शेतकऱ्याने भीषण दुष्काळामुळे हतबल झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग  केला आहे.



अंबाजोगाई : प्रतिनिधी 

शासनाने दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करावेत यासाठी अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडी येथील उत्तम भानुदास शेप या शेतकऱ्याने भीषण दुष्काळामुळे हतबल झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग  केला आहे. गावातील मारुती मंदिरासमोर या शेतकर्‍याने  ठाण मांडले आहे. उत्तमराव यांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत.

अंबाजोगाई तालुक्यावर गेल्या पाच वर्षापासून दुष्काळाचे भीषण सावट आहे. यावर्षी तर दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. खरीप पेरणी वाया गेली. रब्बीचा तर पेराच झाला नाही. यावर्षीही पावसाळा संपत आला तरी पाऊस नाही. यार्षीही पुन्हा पेरणी नाही. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गावात पिण्याचे पाणी नाही, रेशन नाही, गुरांना चारा नाही. वर्षभर पाऊस नसल्याने कसलाच चारा नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती नसताना ही त्यांना पाच हजार रुपये प्रति टन दराने चारा खरेदी करावा लागत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ लागला आहे.

या स्थितीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. गुरांचे व माणसांचे बेहाल सहन होत नसल्याने हनुमान यांचे निसिम्म भक्त असल्याने श्रद्धेपोटी अन्नत्याग करून हनुमान मंदिरात ठाण मांडून बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशीही ते मंदिरात बसून आहेत. उत्तमराव यांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थ  चिंताग्रस्त झाले आहेत.