Sat, Jun 06, 2020 17:18होमपेज › Marathwada › परळीजवळ कारखान्यात स्फोट; एक ठार, 2 जखमी(video)

परळीजवळ कारखान्यात स्फोट; एक ठार(video)

Published On: Feb 17 2019 4:09PM | Last Updated: Feb 17 2019 5:38PM
परळी-वैजनाथ : प्रतिनिधी

परळीजवळ गजानन एक्स्ट्रेशन या रिफाईंड ऑईल व पेंड निर्मिती करणार्‍या कारखान्यात स्फोट झाला. कारखान्याच्या आवारात असलेल्या केमिकलचे कॅन्ड व इतर साहित्य साठवून ठेवलेल्या विभागात रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये गंभरी जखमी झालेल्या तिघांपैकी एकाचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. 

 परळी येथे गजानन एक्स्ट्रेशन या रिफाईंड ऑईल व पेंड निर्मितीचा कारखाना आहे. हा कारखाना मागील दोन वर्षांपासून बंद आहे. सध्या या  कारखान्यात दुरुस्तीचे काम सुरु आहे. दरम्यान,रविवारी (दि. १७) रोजी सकाळी दहा वाजण्‍यास सुमारास कारखान्याच्या आवारात असलेल्या केमिकल  व अन्य साहित्य साठवलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोट कशाने झाला हे स्पष्ट झाले नसले तरी ज्वलनशील असलेल्या  केमिकल ड्रमचा आगीशी संपर्क आल्याने स्फोट झाल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 या स्फोटात अकोला येथील गोपाळ गंगणे याचा मृत्यू झाला तर ज्ञानोबा लुंगेकर आणि गोपाळ घाटोळकर हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.