Mon, Jun 01, 2020 17:14
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › आंबट-गोड चिंचेतून मिळतोय महिलांना रोजगार 

आंबट-गोड चिंचेतून मिळतोय महिलांना रोजगार 

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:39PMअंबाजोगाई : रवी मठपती 

चवीला आंबट गोड व औषधी असलेल्या चिंचेचा सध्या मोसम आहे. घरकाम आटोपून अनेक महिला मुलाबाळासहीत चिंचा फोडून प्रपंचास हातभार लावत आहेत. दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुपये चिंचा फोडून मिळत आहेत. फोडलेली चिंच अंबाजोगाईहून शेजारच्या लातूर शहरात तसेच अहमदनगर व हैदराबादला विक्रीसाठी नेली जात आहे. उन्हाळ्यात महीलांच्या हाताला काम मिळत नाही.काहीतरी रोजगार करून घर भागवणे त्यांना आवश्यक आहे. घरकाम आटोपून घराला हातभार लावण्यासाठी अनेक गृहिणींना धडपडावे लागते. शाळा, महाविद्यालयास उन्हाळी सुट्या लागल्या असल्याकारणाने मुलीही आईला कामात मदत करत आहेत.

चवीला आंबट गोड व औषधी असलेल्या चिंचेचा सध्या मोसम आहे. स्वयंपाक घरात चिंचेला विशेष महत्व असते. अंबाजोगाई शहरात चिंचेचा व्यापार करणारे वीसेक व्यापारी आहेत. हे व्यापारी तालुक्यातील मांडवा पठाण, साकूड, चनई, साताफळ, पळसखेडा, बोरीसावरगाव या शिवारातील चिंचाची झाडे खरेदी करतात. गुढीपाडव्याला व्यापारी शेतकर्‍यांसोबत सौदा करतात. चिंचा पिकल्यास त्या झोडपून उतरल्या जातात. साधारणतः एका झाडाचा पाच ते आठ हजाराचा ठराव होतो. प्रत्येक चिंच व्यापार्‍याकडे पंधरा ते वीस महिला मजूर आहेत. चिंचा फोडण्यासाठी  प्रती किलो सात ते दहा रुपये दिले जातात. दिवसाकाठी एक महिला पंधरा किलो चिंचा फोडून दीडशे दोनशे रुपये कमावते. येथील धनगर गल्ली, साबून गल्ली, लेंडी गल्ली, खतीब गल्ली, मंगळवार पेठ याठिकाणी चिंच फोडली जाते. महिलांना  उन्हाळ्यात घरबसल्या दीड ते दोन महिने  रोजगार मिळाला आहे. 

Tags : Marathwada, Employment,  women