Mon, Jul 06, 2020 16:30होमपेज › Marathwada › उस्‍मानाबाद : शिक्षिकेचा विनयभंग करणारा शिक्षणाधिकारी अटकेत

उस्‍मानाबाद : शिक्षिकेचा विनयभंग करणारा शिक्षणाधिकारी अटकेत

Published On: May 22 2018 10:55PM | Last Updated: May 22 2018 10:55PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

सहकारी शिक्षिकेशी मोबाईलवर अश्‍लिल चॅटिंग करणार्‍या शिक्षणाधिकारी सचिन जगतापला शरण आल्यानंतर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. महिनाभरापासून जगताप पोलिसांना गुंगारा देत होता. 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप याच्यावर एप्रिल महिन्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला हा गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याने आनंदनगर पोलिसांवर टिकेची झोड उठली होती. संबंधित महिलेने याची तक्रार जिल्हाधिकारी तसेच महिला आयोगाकडे केल्यानंतर सूत्रे वेगाने हालली. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी यात लक्ष घालून अखेर जगताप विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिस निरीक्षक गात यांच्यावर कारवाई करीत त्यांची पोलिस मुख्यालयात बदलीही केली होती. जगताप याचा याने फरार असतानाच्या काळात जामिनासाठी धावपळ केली होती. उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने तो अखेर मंगळवारी पोलिसांना शरण आला. दरम्यान, जगताप याला ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक देशमुख यांनी पुढारीशी बोलताना दिली.