Sun, Jun 07, 2020 14:03होमपेज › Marathwada › ड्रंक अँड ड्राइव्ह  : कारच्‍या अपघातात मित्र-मैत्रिण जखमी

ड्रंक अँड ड्राइव्ह : अपघातात मित्र- मैत्रिण जखमी

Published On: Jan 31 2019 8:18AM | Last Updated: Jan 31 2019 8:35AM
लातूर : प्रतिनिधी

मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात कार चालवणाऱ्या युवकाची कार डिव्हायडरवर आदळून उलटली. शहरातील औसा रस्त्यावर असलेल्या आर. जे. कॉम्प्लेक्स जवळ मध्यरात्री हा अपघात झाला.

कारचालक दैवीक शेट्टी आणि त्याची मैत्रीण या अपघातात जखमी झाली. ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या या युवकावर पोलिस कोणती कारवाई करणार हे पाहणे उत्‍सुकतेचे ठरणार आहे. याविषय अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.