Mon, Jun 01, 2020 18:33
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › बुडणाऱ्या मुलांना वाचविताना आईसह तिघांचा मृत्यू

बुडणाऱ्या मुलांना वाचविताना आईसह तिघांचा मृत्यू

Published On: Mar 19 2019 5:12PM | Last Updated: Mar 19 2019 5:12PM
माजलगाव :  प्रतिनिधी 

अंघोळीसाठी गेलेल्या आपल्या बालकांना बुडत असताना वाचवण्यासाठी गेलेल्या आईसह दोन बालकाचा बुडून मृत्यू झाला. माजलगाव धरणात धुणे धुण्यासाठी आईसोबत ही बालके गेले होती यावेळी ही दुर्देवी घटना घडली. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. आई शेख नसू शेख नामु (वय ३०), शेख सोहेल शेख नजीम (वय ११), बहिणीची मुलगी शेख तबु शेख गफार (१३) अशी या मृताची नावे आहेत.

माजलगाव शहरा जवळ आसलेल्या भाटवडगाव येथे आपल्या आई वडिलांना औरंगाबाद येथुन भेटण्यासाठी शेख नशो शेख आपल्या मुलासह आल्या होत्या. आज सकाळच्या सुमारास त्या धुणे धुण्यासाठी आपल्या मुलांना घेवून माजलगाव धरणात गेल्या होत्या. याचवेळी मुलगा सोहेल व तबो हे दोघे या परिसरात असणाऱ्या मोठ्या खड्यात उतरले. खड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडू लागले. याचवेळी बुडत असलेल्या आपल्या मुलांना वाचविण्यासाठी शेख नसू गेल्या असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला.

यावेळी शेख नसू यांच्या सोबत आलेला मुलगा रडत बसला होता. यावेळी परिसरातील लोकांनी विचारपुस केली असता ही दुर्घटना झाल्याचे समजले. या घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मछ्चिमार भोई यांच्या मदतीने या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने परिसरात मोठी हळहाळ व्यक्त होत आहे. .