Thu, Jun 04, 2020 13:04होमपेज › Marathwada › कुत्र्यांचा रोही प्राण्‍यावर हल्ला 

कुत्र्यांचा रोही प्राण्‍यावर हल्ला 

Published On: Jul 07 2019 6:39PM | Last Updated: Jul 07 2019 5:56PM
हिंगोली : प्रतिनिधी 

ग्रामीण भागात रोहींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख शिवारात रविवारी दुपारी 4 ते 5 शिकारी कुत्र्यांनी रोहींवर हल्ला करून गंभीर जखमी केले. 

 ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोहींची संख्या आहे. रोहींचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून होत असते. रोही, हरण शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. मात्र रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास औंढा नागनाथ तालुक्यातील लाख शिवारात 4 ते 5 शिकारी कुत्र्यांनी रोहीवर हल्ला केला. या हल्ल्यात रोहीच्या मानेची लचके तोडले.

घटनास्थळी शेतकरी नागोराव लोंढे यांना ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी त्या कुत्र्यांना पळविण्याचा प्रयत्न केला. रोही नदीत असल्यामुळे त्याला पाण्याबाहेर काढणे अवघड होत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.