Sun, Oct 20, 2019 12:03होमपेज › Marathwada › धनंजय मुंडे-सुरेश धस, आडसकर एकाच दिवशी मतदारांच्या भेटीला

धनंजय मुंडे-सुरेश धस, आडसकर एकाच दिवशी मतदारांच्या भेटीला

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 9:51PMअंबाजोगाई : अ. र. पटेल 

बीड-लातूर-उस्मानाबाद विधान परिषदेची निवडणूक अंतीम टप्प्यात आली तरी उमेदवार मतदारापर्यंत पोहोचलेले नाहीत, तर दुसर्‍या बाजुला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, उमेदवार सुरेश धस, रमेश आडसकर अंबाजोगाई शहरात मंगळवारी दाखल झाले. मुंडेनी मुंदडाकडे तर धस, आडसकरांनी बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदीकडे चहापान घेतले असले तरी अद्याप स्थिती स्पष्ट दिसत नाही.
बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये राजकीय भूकंप आला होता. त्यामुळे पक्षाने माजी आमदार सुरेश धस यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पक्षातील काही नेत्यांची नाराजी होती म्हणून प्रक्रियेपासून अक्षय मुंदडानाही दोन हात लांब ठेवले होते. मुंदडा यांचे जिल्ह्यातील नेत्याशी मतभेद होते, वरिष्ठांशी नव्हते.

मंगळवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा यांच्या आई बंगल्यावर मतदाराच्या भेटीला आले असता नगरसेवक, जि. प. सदस्य उपस्थित होते.  याच दरम्यान  भाजपचे उमेदवार सुरेश धस, रमेश आडसकरांनी अंबाजोगाईत मतदाराच्या भेटी घेतल्या. काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले मात्र ऐनवेळी लातूर व नांदेडच्या पक्षांतर्गत गटबाजीचे बळी ठरलेले बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पापा मोदी सध्या उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत. आडसकर-मोदी कुटुंबाचे असलेले संबंध पाहता मोदी काँग्रेसचे सहा-सात मतदान कोणाच्या पारड्यात टाकतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचे उमेदवार धस व आडसकरांनी मोदीच्या घरी चहापान घेतल्याने मोदीच्या भूमिकेकडे राष्ट्रवादी बारकाईने पाहात असल्याचे दिसते.