Sat, Jun 06, 2020 00:25होमपेज › Marathwada › धनगर समाजाचे वडवणीत आंदोलन

धनगर समाजाचे वडवणीत आंदोलन

Published On: Aug 05 2018 1:30AM | Last Updated: Aug 05 2018 1:30AMवडवणी : प्रतिनिधी

धनगड व धनगर हे दोन्ही समाज एकच आहेत, परंतु दोन्ही समाज वेगवेगळे असल्याचे सांगण्यात येते. बीड जिल्ह्यात धनगड जातीचे कोण आहेत त्यांची नावे व पत्ते जाहीर करावेत नसता धनगर व धनगड हे एकच आहेत हे जाहीर करून धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी  शनिवारी वडवणी तहसील कार्यालयावर  मोर्चा  काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

अहिल्यादेवी होळकर चौक ते तहसील कार्यालयापर्यत मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात धनगड समाज नसताना शासनाने जिल्ह्यात 530 अशी लोकसंख्या दाखविल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. धनगड व धनगर हे एकच आहेत परंतु धनगर समाजाचा फक्त मता पुरता वापर करून धनगड व धनगर हे वेगळे असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात धनगड कोण आहेत त्यांची नावे व पत्ते शासनाने जाहीर करावेत नसता दोन्ही समाज एकच असल्याचे जाहीर करून धनगर समाजाचा समावेश एस.टी. प्रवर्गामध्ये करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.