Sun, Jun 07, 2020 09:26होमपेज › Marathwada › मराठवाडा : सौताडा धबधब्यात डोक्यात दगड पडून तरुणाचा मृत्यू

मराठवाडा : सौताडा धबधब्यात डोक्यात दगड पडून तरुणाचा मृत्यू

Published On: Aug 16 2018 5:25PM | Last Updated: Aug 17 2018 1:35AMपाटोदा : प्रतिनिधी

सौताडा येथील रामेश्वर दरीत धबधब्यात मौजमजा करत असतानाच तरुणाच्या डोक्यात दगड पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अनिल रावसाहेब शेकडे (रा. गौखेल ता. आष्टी) असे या तरूणाचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सौताडा येथील रामेश्वर दरीत धबधब्यात काही तरूण मौजमजा करत होते. याचवेळी अचानक धबधब्यावरून दगड कोसळला. हा दगड तिथे असणाऱ्या अनिल शेकडे याच्या डोक्यात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, यात आणखी एक जण जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत.