Thu, Jun 04, 2020 23:32होमपेज › Marathwada › जोरदार खडाजंगीनंतर अध्यक्षांनी सभा तहकूब केली 

उस्मानाबाद : ‘भारत बंद’वरुन पालिका सभेत वादावादी

Published On: Sep 10 2018 7:42PM | Last Updated: Sep 10 2018 7:40PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

‘भारत बंद’ला पाठिंबा म्हणून तसा ठराव घ्यावा व आजची सभा उद्या घ्यावी, ही राष्ट्रवादीची मागणी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकरांनी फेटाळल्यानंतर पालिका सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला. वादावादी वाढल्याने अखेर नगराध्यक्षानी सभा तहकूब करीत विषय पत्रिकेवरील विषयही नामंजूर केले.

पालिकेची आज, सोमवार दि. १० सष्टेंबर दुपारी एक वाजता सर्वसाधारण सभा होती. सभागृह सुरु होताच विरोधी पक्ष राष्ट्रवादीने आज भारत बंद असल्याने नागरिकांच्या भावना सभागृहाने समजून घ्याव्यात. महागाईविरोधात एक ठराव घ्यावा व आजची सभा तहकूब करुन ती उद्या घ्यावी, अशी मागणी लावून धरली. यात नगरसेवक माणिक बनसोडे आग्रही होते. त्या वेळी नगराध्यक्ष राजेनिंबाळकरांनी हा विषय सभागृहाच्या अखत्यारितला नसल्याचे कारण सांगत सभा सुरु केली.

त्यानंतर मागील सभेत झालेल्या चर्चेनुसार सर्वसाधारण सभा नागरिकांच्या उपस्थितीत घ्यावी, तरच ही सभा चालेल, अशी आक्रमक भूमिका नगरसेवक बनसोडे यांनी घेतली. त्यावर शिवसेना महिला नगरसेवकांचा याला विरोध असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. त्यावर संतप्‍त होत बनसोडे यांनी नगराध्यक्षांच्या टेबलवरील दूरध्वनी उचलून आपटला. त्यानंतर झालेल्या गोंधळात अखेर नगराध्यक्ष सर्व विषय नांमजूर करीत सभा तहकूब केली.