Mon, Jun 01, 2020 19:04
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › काँग्रेस विजयाचा जिल्ह्यात जल्लोष

काँग्रेस विजयाचा जिल्ह्यात जल्लोष

Published On: Dec 12 2018 1:53AM | Last Updated: Dec 12 2018 1:31AM
बीड : प्रतिनिधी

भारतीय काँग्रेस पक्षाचे राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यात एकहाती सत्ता मिळविली. या पार्श्‍वभूमीवर बीड शहरासह परळी, अंबाजोगाई या ठिाकणी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी हा काँग्रेस पक्षाचा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रीया जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. राहुल साळवे यांनी व्यक्त केली.
बीड शहरातील बशीरगंज चौकात मंगळवारी दुपारी फटाके फोडून पदाधिकार्‍यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. राहुल साळवे, तालुकाध्यक्ष महादेव धांडे, विधी सेलचे अ‍ॅड. कृष्णा पंडित, शहादेव हिंदोळे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, शहराध्यक्ष इद्रीस हाशमी, फरीद देशमुख, गणेश राऊत, विट्ठल जाधव, डॉ.बापूसाहेब चौरे, डॉ. दिलीप मोटे, अविनाश डरपे, शकील खान, डॉ.इशांत पटेल, गोविंद साठे, डॉ. शेर खान, शहानवाज खान, संतोष निकाळजे, शामसुंदर जाधव, नदीम पटेल, चरणसिंह ठाकूर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

परळीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी संपर्क कार्यालयामध्ये कार्यकर्ते जमले. युवक काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष तथा परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराच्या प्रमुख मार्गावरून विजयी मोटारसायकल रॅली काढून चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सूर्यकांत मुंडे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलाहुद्दिन, महेश बँकेचे संचालक ओम प्रकाश सारडा, जि. प. सदस्य प्रदीप मुंडे, एकता वादी रिपाइंचे पंडित झिंजुर्डे, माजी नगरसेवक विश्‍वनाथ देवकर, सुदाम लोखंडे, शेख इलियास, मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जगतकर, शहराध्यक्ष मनोहर मुंडे, नितीन शिंदे ,गुलाब पठाण उपस्थित होते.

अंबाजोगाईत आनंदोत्सव साजरा

अंबाजोगाई शहरातील सावरकर चौकात  कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मंगळवारी सकाळपासून पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर हाऊू लागले तसतसे अंबाजोगाईतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह संचारला अंबाजोगाई शहरात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले त्यांनी गुरूवार पेठ येथील बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल पेढे भरवून शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सावरकर चौकात युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राणा चव्हाण, राजकिशोर मोदी मित्रमंडळाचे माणिकराव वडवणकर, नगरसेवक वाजेद खतीब,दिनेश घोडके आदींसहीत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.