Mon, Sep 16, 2019 05:41होमपेज › Marathwada › मांस विक्री करणाऱ्या दोन गटात हाणामारी, ५ गंभीर 

मांस विक्री करणाऱ्या दोन गटात हाणामारी, ५ गंभीर 

Published On: Feb 21 2018 2:19PM | Last Updated: Feb 21 2018 2:19PMपैठण : मनोज परदेशी

दुकान लावण्याच्या वादातून मांसविक्री करणार्‍या दोन गटातील  जमावामध्ये झालेल्‍या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पैठण शहरामधील नेहरू चौक परिसरात ही घटना घडली. जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत असून, यामध्ये दोन जणाची प्रकृती गंभीर आहे. या दोघांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील (घाटी) शासकीय रूग्णांलयामध्ये दाखल करण्यात आहे. 

मांस विक्रीचे दुकान लावण्याच्या कारणावरून दोन गटात वादावादी झाली. या वादावादीचे मारामारीत रूपांतर झाल्‍यानंतर दोन्ही गटाकडून काट्या आणि सत्तूरने एकमेकांवर वार करण्यात आले. 

या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात अद्याप पर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले नाही. या घटनेमुळे परिसरात तणापूर्ण परीस्थिती निर्माण झाली असून, घनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.