Sat, Oct 19, 2019 09:44होमपेज › Marathwada › कल्पना गिरी हत्याप्रकरणी मुख्य आरोपी महेंद्रसिंह चौहानला जामीन 

कल्पना गिरी हत्याप्रकरणी मुख्य आरोपी महेंद्रसिंह चौहानला जामीन 

Published On: Dec 09 2018 11:12PM | Last Updated: Dec 09 2018 11:12PM
लातूर : प्रतिनिधी

लातूर शहर युवक काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. कल्पना गिरी हत्येप्रकरणी कारागृहात असलेला मुख्य आरोपी महेंद्रसिंह चौहान यास औरंगाबाद उच्च न्यायालयाने पाच लाखाच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. २१  मार्च २०१४ रोजी कल्पना यांचा मृतदेह तुळजापूर जवळील पाचुंदा तलावात आढळला होता. महेंद्रसिंह व कल्पना हे लातूर  शहराबाहेर  एकत्र गेल्याची माहिती मिळाल्याने या प्रकरणी महेंद्रसिंहवर पोलिसांचा संशय होता. २७ मार्च २०१४ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महेंद्रसिंह व त्याचा मित्र समीर किल्लारिकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९  मार्च २०१४ रोजी महेंद्रसिंह हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाला होता. तेव्हापासून तो कारागृहात होता. ५ डिसेंबर २०१८ रोजी त्याला न्या. पी. आर. बोरा यांच्या न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यानुसार त्याने खटल्याच्या तारखे शिवाय लातूर जिल्ह्यात प्रवेश करू नये. त्याने त्याचा पासपोर्ट एमआयडीसी पोलिसात जमा करावा. राहत्या घराचा पत्ता व मोबाईल नंबर पोलिसांना द्यावा अशा अटी घातल्या आहेत.