Sun, Oct 20, 2019 17:07होमपेज › Marathwada › मुख्यमंत्र्यांसह खासदार, आमदार गोपिनाथ गडावर!

मुख्यमंत्र्यांसह खासदार, आमदार गोपिनाथ गडावर!

Published On: Jun 03 2019 2:57PM | Last Updated: Jun 03 2019 2:57PM
परळी वैजनाथ ः प्रतिनिधी

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार गोपीनाथ गडावर दाखल झाले. त्यांनी गोपीनाथ गडावर स्व. मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. 

सकाळी 11 वाजता रामायणाचार्य ह. भ. प. ढोक महाराज यांचे किर्तन पार पडले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महादेव जानकर तसेच अन्य मंत्री, खासदार, आमदार, मान्यवरांनी लोकनेत्याचे दर्शन घेतले.