Wed, Jun 26, 2019 02:07



होमपेज › Marathwada › शुभ कल्याण’विरोधात न्यायालयात चार्जशिट 

शुभ कल्याण’विरोधात न्यायालयात चार्जशिट 

Published On: Jan 03 2019 12:34AM | Last Updated: Jan 03 2019 12:02AM




बीड :  शिरीष शिंदे

जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टिस्टेटविरोधात बीड जिल्ह्यातील दहा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सहा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सहा गुन्ह्यांचे चार्जशिट बीड व माजलगावच्या विशेष सत्र न्यायालयात बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने चार्जशिट दाखल केले आहे. 6 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे सहा गुन्ह्यांमध्ये नमूद आहे.

बीड जिल्ह्यात शुभकल्याणच्या संचालकांविरुद्ध नेकनूर, बीड शहर, गेवराई, आष्टी, माजलगाव शहर, व वडवणी, धारूर, अंबाजोगाई शहर, केज व परळी येथील संभाजी नगर पोलिस ठाण्यांत शुभकल्याणविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आवरगाव येथील शुभकल्याण मल्टिस्टेटने गुंतवणुकदारांना अमिष दाखवून त्यांची फ सवणू केल्याचे मागच्या वर्षात समोर आले होते. बीड जिल्ह्यासह राज्यातही असाच प्रकार घडल्याने अध्यक्षांसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्ह्यात जवळपास 13 कोटी तर मराठवाड्यातील हा आकडा 100 कोटींच्या जवळपास असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.  

नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या 22 पैकी मुख्य आरोपी असलेल्या शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास 25 ऑगस्ट 2018 रोजी पुण्यातून अटक केली होती. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस निरिक्षक घनश्याम पाठवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे पथकाचे सपोनि व्हि.एस. पाटील, पोलिस नाईक राजु पठाण, राम बहिरवाळ, गंगाधरी मस्के तपास करीत आहे.

मुख्य आरोपी ताब्यात

दिलीप आपेट हा शंभू महादेव साखर कारखान्याचा चेअरमन आहे. विविध ठिकाणच्या शेतकर्‍यांनी या कारखान्याला आपला ऊस गाळपासाठी दिला होता. उसाचे बील न मिळाल्याने शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारखान्याचा लिलाव करण्याचे आदेश होते. बीड जिल्ह्यातील दहा ठाण्यात दाखल झालेल्या दहा गुन्ह्यात जवळपास 20 आरोपींचा समावेश असून त्यातील मुख्य आरोपी दिलीप आपेट याला पोलिसांच्या ताब्यात घेतले होते.  

ठाण्यातील फसवणुकीची रक्कम

नेकनुर पोलिस ठाण्यात 46 लाख 43 हजार, बीड शहर ठाण्यात 51 लाख 92 हजार, गेवराई ठाण्यात 11 लाख 41 हजार, आष्टी ठाण्यात 1 कोटी 22 लाख, माजलगाव शहर ठाण्यात 3 कोटी 44 लाख तर वडवणी ठाण्यात 34 लाख 66 हजार रुपये फ सवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यावरुन दहा गुन्हे दाखल झाले आहेत.