Thu, Oct 17, 2019 13:42होमपेज › Marathwada › सीआरपीएफ जवानांच्या जीपला अपघात; एक जवान जागीच ठार

सीआरपीएफ जवानांच्या जीपला अपघात; एक जवान जागीच ठार

Published On: May 22 2019 8:57AM | Last Updated: May 22 2019 9:04AM
लातूर : प्रतिनिधी

लातूर नांदेड रोडवर असलेल्या अष्टामोड येथे सीआरपीएफच्या जीपला आज (ता.२२) सकाळी एका खासगी बसने जोराची धडक दिली. या धडकेमध्ये एक जवान जागीच ठार झाला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघातामध्ये मृत्यू झालेल्या जवानाचे जितेंद्र चौधरी असे नाव आहे. जखमींवर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.