Sun, May 31, 2020 02:15होमपेज › Marathwada › दोघे एकाच जातीचे, मग खून का केला ?(Video)

दोघे एकाच जातीचे, मग खून का केला ?(Video)

Published On: Dec 21 2018 1:25AM | Last Updated: Dec 21 2018 7:38AM
बीड : शिरीष शिंदे

आपल्या पेक्षा खालच्या जातीतील मुलाचा किंवा मुलीचा विवाह केला तर ऑनर किलिंगच्या घटना यापूर्वी घडल्याचे समोर आले आहे. परंतु सुमित-भाग्यश्री एकाच जातीचे होते. मग सुमितचा खून त्याच्या मेव्हण्याने का केला ?, आज ना उद्या भाग्यश्रीचे समाजातील कोणत्या तरी मुलासोबत विवाह होणारच होता मग बालाजीने हे टोकाचे पाऊस उचलून बहिणीचा संसार उमलण्याआधीच का उद्ध्वस्त केला हा विषय गुरुवारी बीड शहरातील सर्व सामान्य नागरिकांतून चर्चिला गेला.

भाग्यश्रीने सुमित शिवाजीराव वाघमारे याच्या सोबत विवाह केल्यामुळे त्याच्या राग होता.  विशेष म्हणजे सुमित व भाग्यश्री हे दोघे बौद्ध समाजाचे होते. त्यांच्या लग्नास भाग्यश्रीच्या घरच्या मंडळीचा विरोध असला तर सुमितच्या घरच्या मंडळीकडून कोणाताही विरोध नव्हता. आज ना उद्या मुलिकडील मंडळी या विवाहास राजी होती अशी आशा सुमित व भाग्यश्री यांना असावी मात्र तसे घडले नाही. भाग्यश्रीचा भाऊ बालाजी हा आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज समोर येऊन थांबला. हे दोघे नवरा बायको गाडीवरुन निघाले असतानाच त्याला आडवून धारदार शस्त्राने सपासप वार केले. चार ते पाच वार केले असता सुमित रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही क्षणातच हा प्रकार घडला.

वाचा : ‘पोलिसांनी दखल न घेतल्‍यानेच ऑनर किलिंग’(व्हिडिओ) 

थोडी मोठी वादावादी झाली असती तर त्या ठिकाणी कोणीतरी मध्यस्ती केली असते मात्र बालाजी हा रागाच्या भारात असावा आणि खून करण्याच्या भावनेतूनच तो कॉलेजच्या आवारात थांबला होता असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. बालाजी व त्याचा साथिदार गुरुवार सांयकाळपर्यंत पकडला नव्हता. त्याला पकडल्यावर त्याने खून का केला हे समोर येईल मात्र हा ऑनर किलिंचाच प्रकार आता पर्यंत तरी मानले जात आहे.

आश्‍वासनानंतर प्रेत घेतले ताब्यात

आरोपींच्या अटकेपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी आरोपींच्या अटकेचे आश्‍वासन दिले. यानंतर सुमितच्या पार्थिवावर तालखेड येथे अंत्यसंस्कार झाले.

तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले

बालाजीने स्वतःचे व बहिणीच्या पतीचे आयुष्य तर संपविले शिवाय आपल्या बहिणीचा संसार फु लण्यापूर्वीच उद्ध्वस्त करून टाकला अशी प्रतिक्रिया सर्व सामान्यांतून गुरुवारी व्यक्‍त करण्यात आल्या. फार वाईट घटना घडली, भाग्यश्री बद्दलची हळहळ अनेकांच्या चर्चेतून समोर आली.