Sun, Oct 20, 2019 17:09होमपेज › Marathwada › बिड : चोरट्यांचा धुमाकूळ ८० हजारांचा ऐवज लंपास

बिड : चोरट्यांचा धुमाकूळ ८० हजारांचा ऐवज लंपास

Published On: Aug 13 2019 9:08AM | Last Updated: Aug 13 2019 8:56AM

कलांबा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळीगेवराई : प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे (ता.१३) रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका घरातून ८० हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. दरम्यान यावेळी तीन घरी चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. या घटनेने कोळगावसह परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस कोळगावात दाखल झाले आहेत.

कोळगाव येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. येथील बाबासाहेब गवळी, मदनराव घाडगे, बंडू काशिद यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी घरातील नागरिकांना जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने त्यांनी याठिकाणाहून पळ काढला. यानंतर कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत असलेल्या उद्धव करांडे यांच्या घरामध्ये चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. 

दरम्यान उध्दव करांडे यांच्यासह घरातील अन्य सदस्य झोपलेल्या दोन खोलीला बाहेरुन लाँक करुन चोरट्यांनी किचन रुममधील डब्यात ठेवलेले २ तोळे सोने, तसेच अन्य एका रुममधील पेटीत ठेवलेले २० हजारांची रक्कम असा ऐकून ८० हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. पहाटे उठल्यानंतर रुमचे दरवाजे बाहेरून लाँक असल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव करांडे यांनी आवाज दिल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन रुमचे लाँक उघडले. यावेळी हा घडलेला प्रकार लक्षात आला. 

या घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान एकाच रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने कोळगावसह परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.