Tue, Sep 17, 2019 04:12होमपेज › Marathwada › तूर एकाची, पैसे दुसर्‍याच्या खात्यात; ग्रेडरने दिल्या दोन शेतकर्‍यांच्या हातावर ‘तुरी’

तूर एकाची, पैसे दुसर्‍याच्या खात्यात; ग्रेडरने दिल्या दोन शेतकर्‍यांच्या हातावर ‘तुरी’

Published On: Nov 21 2018 1:06AM | Last Updated: Nov 21 2018 1:06AMबीड : प्रतिनिधी

वडवणी तालुक्यातील पुसरा येथील दोन शेतकर्‍यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुर दिली होती. याचे पैसे चोरमले नावाच्या ग्रेडरने परस्पर इतरांच्या खात्यावर वर्ग केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकर्‍यांचे पैसे परस्पर इतरांच्या खात्यावर वर्ग करणार्‍या चोरमले यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी सबंधित शेतकर्‍यांनी जिल्हा मार्केॅटींग अधिकारी  यांच्याकडे केली आहे. 

पुसरा येथील शेतकरी ज्ञानोबा मस्के, बजरंग मस्के या शेतकर्‍यांनी मागील वर्षी अनुक्रमे 12 क्विंटल आणि 4 क्विंटल 84 किलो तुर वडवणी येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर दिली होती. या तूरीचे पैसे अजूनही या शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. दरम्यान बहुतांश शेतकर्‍यांचे तुरीचे पैसे मिळाले, अपाले पैसे का आले नाहीत याची चौकशी शेतकर्‍यांनी केली असता नाफेडचे ग्रीडर चोरमाले यांनी ज्ञानोबा मस्के आणि बजरंग मस्के यांचे तुरीचे 70 हजार रूपये परस्पर वडवणी येथील शाहू बँकेच्या राजेंद्र चाळक व प्रदीप चाळक यांच्या खात्यावर परस्पर वर्ग केले असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. 

दरम्यान शेतकरी मस्के यांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करत आमच्या तुरीचे पैसे आमच्या खात्यावर वर्ग करावेत. आमच्या हक्काचे पैसे इतरांच्या खात्यावर परस्पर वर्ग करणार्‍या चोरमले यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex