Thu, Oct 17, 2019 13:54



होमपेज › Marathwada › बीड : वादळी अवकाळी पावसात दोन ठार (video)

बीड : वादळी अवकाळी पावसात दोन ठार (video)

Published On: Apr 04 2019 6:30PM | Last Updated: Apr 04 2019 8:27PM




बीड : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये गुरुवारी जोरदार वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. वीज कोसळून वेगवेगळ्या घटनेमध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला. केज तालुक्यातील तांबवा येथील तारामती बाळासाहेब चाटे (वय ४०) या त्यांच्या कुंभार शेतात कामासाठी गेल्या होत्या. मात्र दुपारी काम करत असताना पाऊस आल्याने त्या शेतातील झाडाखाली थांबल्या. यावेळी त्याच्यावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दुसरी घटना धारूर तालुक्यातील दुनकवाड येथे घडली. येथे वीज कोसळून संदीपान श्रीकृष्ण काळे (वय २०) यांचा  ही मृत्यू झाला आहे. तसेच बावी तांडा येथेही वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बीड जिल्ह्यामधील अंबाजोगई शहरासह परिसराच्या भागात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाला सुरुवात झाली. तेथे विजेच्या कडकडाटासह गाराचा पाऊस सुरू झाला. अचानक गारांचा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारंबळ उडाली. या दरम्यान गारपीटीचा फटका शेतीला देखील बसला असून आंबा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशीरापर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस चालू होता.