Thu, Jun 04, 2020 21:58होमपेज › Marathwada › बीड : सहा महिन्यात बावीस लाखांची दारू जप्त

बीड : सहा महिन्यात बावीस लाखांची दारू जप्त

Published On: Jul 13 2019 5:24PM | Last Updated: Jul 13 2019 4:48PM
अंबाजोगाई : प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत 21 लाख 93 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागातंर्गत वडवणी, केज, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई हे सहा तालुके येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्या सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू निर्मिती,विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.

सातत्याने धाडी टाकल्या जात असल्याने बेकायदेशीर गावठी दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अंबाजोगाई शहरा लगतच्या  बुट्टेनाथ दरीत ,चनईतांडा व दगडुतांडा याठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या  हातभट्टी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून दोन दिवसाच्या कारवाईत अंदाजे चार लाख रुपये किंमतीचे गुळमिश्रीत रसायन जप्त करून नष्ट केले. अशी माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली. 

सदरच्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,जवान बि. के.पाटील,वाहन चालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.