Thu, Oct 17, 2019 13:46होमपेज › Marathwada › बीड : कर्ज काढून 'त्याची' एव्हरेस्ट स्वारी

बीड : कर्ज काढून 'त्याची' एव्हरेस्ट स्वारी

Published On: May 18 2019 6:14PM | Last Updated: May 18 2019 5:04PM
वडवणी (बीड) : प्रतिनिधी

अगोदरच घरची आर्थिक परिस्थिती बेताची आणि त्यातच गंभीर दुष्काळी परस्थिती यामुळे अडचणीत असलेल्या शेतकर्‍याच्‍या मुलाला एव्हरेस्ट स्वारी करण्यासाठी व्याजाने पैसे काढण्याची वेळ आली. 

वडवणी तालुक्यातील केंडेपिंपरी या अतिशय दुर्गम आणि दुर्लक्षित गावातील शिवाजी भागवत महागोविंद या पदवी झालेल्या तरूणाने गिर्यारोहनाचा छंद जोपासला आहे. एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी अडीच लाखाची गरज होती. केवळ चार एकर जमिन आणि त्यातच दुष्काळी परस्थिती असल्याने घरून खर्च करणे शक्य नव्हते. शिवाजीने अनेक राजकीय पुढाऱ्यांकडे मदत मागितली मात्र मदत जास्त मिळाली नाही. नाईलाजाने व्याजी पैसे काढून मोहीम करावी लागली. या मोहीमेत बेस कँपवर भारतीय तिरंगा फडकविला. 

एव्हरेस्ट बेसकँपवर तिरंगा फडकविणारा शिवाजी महागोविंद हा बीड जिल्ह्यातील पहिलाच तरूण आहे. ऑगस्‍ट महिन्यात आफ्रिकेतील किलीमंजारो या हिमशिखरावर तो चढाई करणार असून पुढील वर्षी एव्हरेस्टवीर होण्याचा मान मिळविण्याचे त्याचे स्वप्न आहे.