Sat, Oct 19, 2019 10:44होमपेज › Marathwada › बीड : गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात

बीड : गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात

Published On: Aug 20 2019 12:13PM | Last Updated: Aug 20 2019 12:01PM

संग्रहीत फोटोबीड : प्रतिनिधी

करंजवन (ता. पाटोदा) येथे डोंगरेश्वर संस्थानमध्ये प्रसाद हातातून पडल्याने १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता वाद झाला होता. यावरून गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ फिर्यादीच्या दिशेने पिस्तूलने गोळीबार केला. मात्र, फिर्यादी सुरक्षित आहे. 

सागर तात्याभाऊ गर्जे (वय २०, रा. करंजवन) यांच्या फिर्यादीवरून राजू चांगदेव खाडे, दादा चांगदेव खाडे( दोघे रा. करंजवन) या दोघांवर कलम ३०७, ५०४, ३४ भादंसं सह कलम ५/ २५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पाटोदा पोलिस ठाण्यात रात्री १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपी ताब्यात घेतले आहेत. पिस्टल जप्त करण्यात आली  आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक विजय लगारे, पाटोदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने, उपनिरीक्षक वैशाली पेटकर यांनी भेट दिली. तपास उपअधीक्षक विजय लगारे हे करीत आहेत.