Mon, Jun 01, 2020 17:37
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › 'बीएसएनएल'चा टॉवर कोसळून एक जखमी; एक म्‍हैस दगावली 

'बीएसएनएल'चा टॉवर कोसळून एक जखमी; एक म्‍हैस दगावली 

Published On: Apr 17 2019 10:29AM | Last Updated: Apr 17 2019 11:49AM
हिंगोली : प्रतिनिधी

सेनगाव शहर व परिसरात मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात 'बीएसएनएल' चा  टॉवर कोसळला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाले आहेत, तर एक म्‍हैस आणि वासरूही दगावले आहे. 

ही घटना प्रभाग क्र १६ मध्ये घडली. यामध्ये अशोक लक्ष्मण कांबळे हे गंभीर जखमी झाले असून, एक म्हैस व एक वासराचा मृत्यू झाला. तर टॉवर पडल्यामुळे पाच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. शिवाय याच परिसरात राहणार्‍या डॉ. घोंगडे यांच्या बोलेरो गाडीवर हा टॉवर पडल्याने गाडीचा चक्काचूर झाला आहे.