Sat, Oct 19, 2019 10:34होमपेज › Marathwada › त्याचवेळी व्यासपीठावर येऊन फेटा बांधणार : खासदार अमोल कोल्हे

त्याचवेळी व्यासपीठावर येऊन फेटा बांधणार : खासदार अमोल कोल्हे

Published On: Aug 25 2019 5:36PM | Last Updated: Aug 25 2019 7:14PM

खासदार अमोल कोल्हेबीड : प्रतिनिधी

परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही. या मतदारसंघात जेव्हा आमचे आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन असा निर्धार खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त आंबेजोगाई येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त आंबेजोगाई येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा यांनी खासदार अमोल कोल्हे यांना फेटा बांधण्यास घेतला. यावेळी कोल्हे यांनी हा फेटा बांधण्यास नकार देत त्यांना हा निर्धार व्यक्त केला. एकप्रकारे केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा आणि परळीतून धनंजय मुंडे निवडून येत नाहीत तोपर्यंत बीडमध्ये फेटा घालणार नाही, असा निश्चय कोल्हे यांनी बोलून दाखवला.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या २००९ पासून परळी मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात या मतदार संघातून अटीतटीची लढत होणार आहे.