Sun, Oct 20, 2019 16:54होमपेज › Marathwada › आष्टी : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या  

आष्टी : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या  

Published On: Aug 03 2018 12:53PM | Last Updated: Aug 03 2018 12:47PMआष्टी :  प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील सतिश होळकर (वय  36) या तरुणाने धामणगाव ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  

संतिश होळकर हा ऊसतोड मजूर असून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्याने आत्महत्या केली  आहे. सतिश होळकर याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आहेत.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सतिश यांचे शवविच्छेदन करुन त्यांच्यावर धामणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.