Wed, Jun 03, 2020 23:55होमपेज › Marathwada › अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू 

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू 

Last Updated: Oct 09 2019 7:45PM
सोनपेठ : प्रतिनिधी 

सोनपेठ (जि. परभणी) येथील बसस्थानकाच्या प्रवेश द्वारावर बुधवार दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. साहेबराव पवार (वय ६५, रा. सायखेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी सकाळी सातच्या सुमारास सोनपेठ येथील बसस्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळ अज्ञात वाहनाने साहेबराव पवार यांना धडक दिली. या धडकेत ते जबर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय बळीराम जाधव हे करत आहेत.