Mon, Jun 01, 2020 18:24
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › अमित शहा सहा जानेवारीला मराठवाडा दौऱ्यावर  

अमित शहा सहा जानेवारीला मराठवाडा दौऱ्यावर  

Published On: Jan 03 2019 12:34AM | Last Updated: Jan 02 2019 4:00PM
लातूर : प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सहा जानेवारीला मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते मराठवाड्यातील चार जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. संघटन व आगामी निवडणुकांच्या विजयाचा संकल्प या बैठकीत होणार असल्याची माहिती पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या जिल्ह्याची संयुक्त बैठक राहणार आहे. या जिल्ह्यातील ५ हजार ७१३ पदाधिकारी त्यात सहभागी होणार आहेत. थोरमोटे लॉन्सवर सकाळी ११ वाजता या बैठकीस सुरुवात होईल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटनमंत्री विजयराव पुराणिक, विभागीय संघटनमंत्री बाबुराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. 

ही बैठक दोन सत्रात होत असून पहिले सत्र सकाळी होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे प्रथम सत्र घेणार आहेत. तर दुपारचे सत्र शहा घेणार आहेत. ६ जानेवारी रोजी  शहा यांचे लातुरात आगमन होईल. त्यादिवशीचा त्यांचा मुक्कामही  लातुरात राहील. 

दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही येण्याची शक्यता असल्याचे पाटील म्हणाले  पत्रकार परिषदेस विभागीय संघटन मंत्री भाऊराव देशमुख, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गुरुनाथ मध्ये जीपचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांची उपस्थिती होत