Sat, Jun 06, 2020 23:18होमपेज › Marathwada › अंबाजोगाई : आठवडी बाजारातून मोबाईलची चोरी

अंबाजोगाई : आठवडी बाजारातून मोबाईलची चोरी

Published On: Jun 15 2019 9:37AM | Last Updated: Jun 15 2019 9:37AM
अंबाजोगाई : प्रतिनिधी 

शहरात दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातून एका शिक्षकाचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

शहरातील गांधीनगर भागात राहणारे शिक्षक सय्यद मोइनोद्दिन सलाउद्दीन हे मंगळवारी भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोंढ्यातील आठवडी बाजारात गेले होते तिथे भाजी घेण्यात गुंग असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. सय्यद मोइनोद्दिन यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईलचा शोध घेतला परंतु सापडला नाही. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे