Sun, Jun 07, 2020 15:00होमपेज › Marathwada › विकासासाठी मांडवा घेतले दत्तक : मुंडे

विकासासाठी मांडवा घेतले दत्तक : मुंडे

Published On: Apr 06 2018 2:21AM | Last Updated: Apr 05 2018 11:59PMबीड : प्रतिनिधी 

विकासापासून मांडवा गाव कोसो दूर होते, आता सरपंचाचा प्रवेश झाल्यामुळे गावचा विकास करणे सहज शक्य होईल. त्यामुळे मांडवा गाव दत्तक घेऊन याचा सर्वांगिण विकास मी करणार आहे. प्रत्येक गावात हाय मास्ट दिवे व शुद्ध पाण्यासाठी फिल्टर प्लांट मंजूर केला आहे, असे आश्‍वासन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी गुरुवारी दिले. 

गावांतील लहान थोर व तरुण मंडळी तसेच महिला यात सहभागी झाल्या होत्या. ग्रामविकास निधीतून अंतर्गत रस्ते सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, प्रवाशी निवारा, तसेच खासदार फंडातील दहा लाख रुपयांच्या सांस्कृतिक सभागृहाच्या कामाचा शुभारंभ पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतीचे सरपंच पार्वतीबाई मुंडे व त्यांचे पती सुंदर मुंडे, ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणबाई चाटे, अंतिका माने यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.

कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा साविता गोल्हार, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, डॉ. शालिनी कराड, श्रीराम मुंडे, सुधाकर पौळ, बिभीषण फड राजेश गित्ते आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीने फक्त घर फोडण्याचेच काम केले

लोकनेते मुंडे साहेबांनी मतदारसंघात विकासाचा सागर आणला. परंतु त्या काळात काम करणार्‍या लोकांनी खालपर्यंत विकासच पोहोचू दिला नसल्याने, हा भाग तसाच राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना त्यांच्या नेत्यांनी या भागात एकही काम केले नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातले नेते येथे येऊन फक्त घर फोडण्याचे काम करतात, अशी टीका त्यांनी केली. विकासाचा आस्वाद घ्यायचा असेल तर, चांगल्या नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभे राहा असे आवाहन त्यांनी केले. 

 

Tags : Pankaja Munde, Mandwa, development, Adoption,